विदर्भ व नागपुरातील शुक्रवारच्या महत्त्वाच्या घडामोडी I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

2021-04-28 3,447

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील सौरभ व चेतन या दोन अंध भावंडांनी बारावीच्या निकालात कला शाखेतून उत्तम गुण प्राप्त करीत कामगिरी बजावली आहे. सौरभ हा पूर्णपणे तर चेतन हा ऐंशी टक्के अंध आहे. दोघेही भाऊ टाकळघाट बुटीबोरी येथे राहतात. त्यांनी नागपूर येथे वसतिगृहात राहून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली.

पत्नीसोबत क्षुल्लक वाद झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून खून केला. त्यानंतर बिअरच्या बटलने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी पित्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक आहे.

14 च्या मध्यरात्री नरखेड तालुक्‍यातील मेंढला,वडविहरा, चांदणीबर्डी, रामपुरी, या भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या शेतांना तलावाचे स्वरुप आले होते. मेंढला येथील शेतकरी ज्ञानेश्वर श्रावण चरपे यांचे शेत नाल्याला लागुन आहे. नाल्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे दोन एकर कपाशी खरडुन गेली व काही भागात पाणी साचले आहे.

आठ दिवसांपूर्वी अमरावती नागझिरी, गोरेगाव परिसरात आढळलेल्या वाघाने आता आपला मोर्चा शेकदरी गव्हाणकुंडकडे वळवला असल्याची शक्‍यता आहे. गव्हाणकुंड परिसरातील शेकदरी शेतशिवारात विष्णू देशमुख यांच्या शेतातील म्हशीची वाघाने शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राळेगाव तालुक्‍यातील वडकीसह परिसरात बुधवारी (ता.15) झालेल्या धुवॉंधार पावसामुळे नाल्यांना आलेले पुराचे पाणी इचोड, एकुर्ली, दहेगाव या गावांत शिरले. घरांसह दुकानांमध्ये हे पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पाण्याने रस्तेही वाहून गेल्याने सहा ते सात गावांचा संपर्क तुटला होता.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires